जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ची स्थापना १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार झालेली आहे. शालेय शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे, शैक्षणिक संशोधन हाती घेणे, शिक्षक प्रशिक्षणाचे नियोजन व आयोजन करणे याकरिता प्रामुख्याने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे.
राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे ही विद्याविषयक मातृसंस्था म्हणून कार्य करते तर जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ही संस्था विद्याविषयक मातृसंस्था म्हणून कार्य करते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ची स्थापना १९९५ रोजी फलटण, जिल्हा -सातारा येथे झाली. या संस्थेच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्चमाध्यमिक स्तरावरील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच सेवापूर्व शिक्षक प्रशिक्षण अंतर्गत अध्यापक शिक्षण पदविका (D.EL.ED.) या कोर्सचे संचालन व नियंत्रण करण्याचे कार्य केले जात आहे.
सविस्तर...