संस्थेविषयी

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ची स्थापना १९८६ च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार झालेली आहे. शालेय शिक्षणातील गुणवत्ता वाढविणे, शैक्षणिक संशोधन हाती घेणे, शिक्षक प्रशिक्षणाचे नियोजन व आयोजन करणे याकरिता प्रामुख्याने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांची स्थापना करण्यात आलेली आहे.

राज्य स्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT), महाराष्ट्र, पुणे ही विद्याविषयक मातृसंस्था म्हणून कार्य करते तर जिल्हा स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ही संस्था विद्याविषयक मातृसंस्था म्हणून कार्य करते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) ची स्थापना १९९५ रोजी फलटण, जिल्हा -सातारा येथे झाली. या संस्थेच्या माध्यमातून अंगणवाडी ते उच्चमाध्यमिक स्तरावरील शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच सेवापूर्व शिक्षक प्रशिक्षण अंतर्गत अध्यापक शिक्षण पदविका (D.EL.ED.) या कोर्सचे संचालन व नियंत्रण करण्याचे कार्य केले जात आहे.

राष्ट्रीय व राज्य स्तरावरून गुणवत्ता वाढीच्या उपक्रम / प्रशिक्षण / सर्वेक्षण यांचे जिल्हा स्तरावर संचालन करणे, सनियंत्रण करणे, विश्लेषण करण्याचे कार्य प्रस्तुत संस्थेमार्फत केले जाते.

श्री.अमोल ज्ञानू डोंबाळे

प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता ( गट-अ) शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एम.ए.,एम.एड.,एम.लिब.ॲण्ड आय.एस्सी.,डी.एस.एम.,नेट (शिक्षणशास्त्र आणि ग्रंथालय शास्त्र), पीएच.डी. (शिक्षणशास्त्र) विभाग :- मूल्यमापन आणि माहिती तंत्रज्ञान फोन नंबर :- ९३७२१०९९७७ ई-मेल :- adombale@gmail.com

श्रीम.विद्या झुंजारराव कदम

प्राचार्य, अधिव्याख्याता ( गट-अ) शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एम.ए.,एम.एड.,डी.एस.एम विभाग :- सेवापूर्व विभाग व पूर्व प्राथमिक शिक्षण विभाग फोन नंबर :- ९४२१५७१८६६ ई-मेल :- vkadam661973@gmail.com

श्रीम.अन्नपूर्णा राजाराम माळी

अधिव्याख्याता ( गट-ब) शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एम.ए.,एम.एड.,डी.एस.एम.,सेट(शिक्षणशास्त्र) विभाग :- समता आणि संशोधन फोन नंबर :- ९९७५७३८५०६ ई-मेल :- maliannapurna0@gmail.com

श्री.कृष्णा मारुती फडतरे

अधिव्याख्याता शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एम.ए.,एम.एड.,सेट(एज्युकेशन),एम.एस.डब्ल्यू विभाग :- भाषा (मराठी,इंग्रजी,उर्दू) विभाग फोन नंबर :- ९७६७०२३८७२ ई-मेल :- krushnaphadatare@gmail.com

श्री.विजयकुमार गोपाळराव कोकरे

अधिव्याख्याता शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एम.ए.,एम.एड.,सेट (एज्युकेशन) विभाग :- सामाजिक शास्त्र फोन नंबर :- ७५८८६३६२६२ ई-मेल :- kokare483@gmail.com

श्रीम.आशा जगन्नाथ घनवट

ग्रंथपाल शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एम.ए.,एम.लिब. विभाग :- ग्रंथालय व आस्थापना विभाग फोन नंबर :- ९७६७६८९८२५ ई-मेल :- aashaghanwat@gmail.com

श्री.बबन महादेव कोळप

लघुलेखक विभाग :- लेखाविभाग अतिरिक्त कामकाज फोन नंबर :- ९८५०१९८८४९ ई-मेल :- baban.kolap1972@gmail.com

श्री.विजय बाजीराव भिसे

वरिष्ठ अधिव्याख्याता शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एम.ए.,एम.एड.,सेट,नेट. विभाग :- CPD फोन नंबर :- ९९२२२७०६६२ ई-मेल :- vijaybbhise10@gmail.com

श्री.प्रशांत रंगराव सावंत

कनिष्ठ लिपिक शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- एस.एस.सी विभाग :- आवक जावक विभाग फोन नंबर :- ९३७०२५९२०३ ई-मेल :- prashantsawant920@gmail

श्री.वैभव रमेश शिरतोडे

शिपाई शैक्षणिक व व्यावसायिक आर्हता :- माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण विभाग :- कोल्हापूर फोन नंबर :- ९६६५२२४९६७ ई-मेल :- vaibhavshirtode@gmail.com
उद्दिष्ट

१.⁠ ⁠सेवापूर्व आणि सेवांतर्गत शिक्षक शिक्षण कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन करणे.

२.⁠ ⁠शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवणे, वाढविणे,लिंग समानता, प्राविण्य आणि गळती या विषयांवर जिल्हास्तरीय शैक्षणिक संशोधन आयोजित करणे.

३.⁠ ⁠सराव करणाऱ्या शिक्षकांना वर्गाध्यापान समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम करण्यासाठी शिक्षण परिषद, शिक्षक प्रशिक्षणाचे आयोजन करणे.

४.⁠ प्राथमिक/उच्च प्राथमिक शिक्षकांच्या नाविन्यपूर्ण अध्ययन- अध्यापन पद्धतींचा शोध घेणे आणि नियतकालिक जिल्हा व तालुकास्तरीय चर्चासत्रे आयोजित करणे.

५.⁠ डी.एल.एड. अभ्यासक्रम, प्रवेश व मूल्यांकन प्रक्रियेचे संनियंत्रन करणे.

६.⁠ ⁠शैक्षणिक, कलात्मक, तंत्रज्ञानात्मक कौशल्याचा विस्तार करून अनौपचारिक शिक्षण क्षेत्राला सहाय्य प्रदान करणे.

७.⁠ ⁠अंगणवाडी सेविकांसाठी बाल मानसशास्त्र, खेळ आधारित शिक्षण इत्यादी बाबतचे घटक संच निर्मिती व प्रशिक्षण देणे.

८.⁠ ⁠सामाजिक समस्या जसे की संकट आणि आपत्ती व्यवस्थापन, लैंगिक संवेदनशीलता, शाळा प्रमुखांसाठी नेतृत्व पुस्तिका इत्यादीची निर्मिती व प्रशिक्षण आयोजन करणे.

९.⁠ ⁠राष्ट्रीय व राज्य स्तरावरून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षण, कार्यशाळा, सर्वेक्षण यांचे जिल्हा व तालुकास्तरावर नियोजन व आयोजन करणे.